AmravatiLatest News

आरटीओ कार्यालयात वाहन तपासणीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

अनुभवी पुरवठादारांकडून मोहोरबंद दरपत्रके आमंत्रित

अमरावती, दि. 19 (जिमाका) :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार होणाऱ्या संपूर्ण वाहन तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयाच्या मान्यतेनुसार ही व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रक्रिया भाडे तत्त्वावर राबविण्यात येणार असून, यासाठी अनुभवी व्हिडिओ रेकॉर्डिस्ट व पुरवठादारांकडून मोहोरबंद दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक व अनुभवी व्यक्ती किंवा संस्थांनी आपली दरपत्रके
“प्रादेशिक परिवहन अधिकारी,
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती – 444602”

या पत्त्यावर सादर करावीत.

दरपत्रके सादर करण्याची अंतिम मुदत 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. वाहन तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, विहित मुदतीत जास्तीत जास्त अनुभवी अर्जदारांनी दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button