अ.भा. आंतर विद्यापीठ योगा (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 19.12.2025)- स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान, बंगलोर येथे 05 ते 09 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगा (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. जागृती पटले, कु. आयुषी पांडे, कु. प्रांजली जगताप व कु. दिपाली राऊत, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. समिक्षा कडू, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतची कु. प्रतिक्षा तुपट, जे.डी. पाटील महाविद्यालय, दर्यापूरची कु. श्रावणी चव्हाण, जी.एस. गावंडे महाविद्यालय, उमरखेडची कु. तेजस्विनी बहाळे व एस.एस.जी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेगांवची कु. प्राची वैराळे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 24 डिसेंबर, 2025 ते 02 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



