AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाची युती व स्वबळाची तयारी; पराग गुदधे यांची माहिती

अमरावती – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून युती तसेच स्वबळाच्या तयारीला वेग आला आहे. सेना–राष्ट्रवादी काँग्रेस–वंचित, सेना–मनसे आणि सेना–काँग्रेस अशा विविध पातळ्यांवर युतीबाबत चर्चा सुरू असल्या तरी, कोणतीही युती अंतिम न झाल्यास शिवसेना उबाठा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

यासंदर्भात शिवसेना उबाठाचे नेते पराग गुदधे यांनी माहिती देताना सांगितले की, पक्षाने स्वबळाची तयारी पूर्ण ताकदीने सुरू ठेवली असून, इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे आणि मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ८७ जागांवर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

युतीबाबत चर्चा सुरू असली तरी कोणताही संभ्रम राहू नये म्हणून स्वबळाची तयारी समांतरपणे सुरू ठेवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button