City CrimeCrime NewsLatest NewsNagpur

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

नागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने गुरुवारी खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आलेल्या धमकीच्या मेलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, संपूर्ण न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धमकीचा मेल गुरुवार, १८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे माननीय प्रधान न्यायाधीश यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाला. ई-मेलमध्ये न्यायालय परिसरात RDX बॉम्ब लावल्याचा दावा करण्यात आला असून, दुपारी २ वाजेपर्यंत स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.

धमकी मिळताच न्यायालय प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा दल तात्काळ अलर्ट मोडवर आले. न्यायालय परिसरात सघन तपासणी मोहीम, बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक, तसेच स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

न्यायालय प्रशासनाने सर्व कर्मचारी, वकील आणि नागरिकांना संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आणि अशा कोणत्याही वस्तूला हात न लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

सध्या हा संपूर्ण प्रकार अत्यंत संवेदनशील असल्याने सुरक्षा तपासणीसाठी सर्वांनी पोलीस व सुरक्षारक्षकांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धमकी पाठवणाऱ्याची माहिती व मेल खरा की अफवा, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button