Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

मुंबई – कोकाटे यांनी दिलेला राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः स्वीकारल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे. कोकाटेंनी 16 तारखेला आपला राजीनामा सादर केला होता. हा राजीनामा आता पुढील निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे.

या संदर्भात बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, कायदे व नियम हे सर्वांपेक्षा वरचढ असून व्यक्तीपेक्षा व्यवस्था अधिक महत्त्वाची आहे. सरकार नियमांनुसारच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, आता या प्रकरणावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button