Amaravti GraminCrime NewsLatest News

अवैध धंदे करणाऱ्यांना भातकुली पोलीस स्टेशनचा इशारा

अमरावती – महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भातकुली पोलीस स्टेशनने अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. दारू, जुगार आणि वरली मटका चालवणाऱ्यांना पोलीस निरीक्षक रविंद्र राजुलवार यांनी थेट इशारा दिला आहे.

भातकुली पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू असून, पोलीस आयुक्तालय अमरावतीच्या अंतर्गत येणाऱ्या भागात प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली जात आहे. पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेल्या अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत समज देण्यात आली की, समज दिल्यानंतरही जर कोणताही अवैध धंदा आढळून आला, तर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल.

भातकुली पोलीस प्रशासन निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button