AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय हालचालींना वेग

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजपा आणि शिवसेनेसह युती करून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार रवी राणा यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची संभाव्य युती होण्याची दाट शक्यता आहे. या युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले.

या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून, संभाव्य युतीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या कोअर कमिटीमार्फत सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती असून, त्या अहवालाच्या आधारे जागावाटप आणि उमेदवारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

युवा स्वाभिमान, भाजपा आणि शिवसेनेच्या संभाव्य युतीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आगामी काळात या संदर्भात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button