AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्यावतीने ‘जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन’ विषयावर 18 डिसेंबर रोजी युवा कार्यशाळेचे आयोजन

विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांचा संयुक्त उपक्रम

अमरावती (दि. 16.12.2025) :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्याथ्र्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्याची वाढ करण्याच्या दृष्टीने ‘जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन’ या महत्वपूर्ण विषयावर दि. 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, विवेकानंद कॉलनी, अमरावती येथे एकदिवसीय युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून श्रीरामकृष्ण मिशन, वडोदरा, गुजरात येथील श्रीमत स्वामी अनंतरानंद यांचे शुभहस्ते युवा कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न होईल.  कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे व सिम्बॉसिस महाविद्यालय, पुणेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. शिरीष लिमये उपस्थित राहतील.

               कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्रीरामकृष्ण मिशन, वडोदरा, गुजरातचे श्रीमत स्वामी अनंतरानंद हे ‘तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात’ या विषयावर, तर दुस­या सत्रात सिम्बॉसिस महाविद्यालय, पुणेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. शिरीष लिमये हे ‘सकारात्मक दृष्टीकोन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर लगेचच उपस्थितांसाठी प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.  दुपारी 4 वाजता कार्यशाळेचा समारोप सत्र संपन्न होणार असून मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्राचे वितरण होईल.

               तरी विद्यापीठाच्यावतीने आयोजित युवा कार्यशाळेला जास्तीतजास्त संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीचे अध्यक्ष श्री हरिहर जिराफे व स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगे·ार कुरवाडे यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button