electionLatest NewsMaharashtra
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

अमरावती, दि. 16 डिसेंबर: नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ दि. 20 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर, मतदान केंद्र म्हणून नियुक्त शाळा आणि महाविद्यालयांना दि. 19 आणि 20 डिसेंबर या दोन दिवसांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरुड, दर्यापूर, आणि धारणी येथील नगरपरिषद व नगरपंचायत मतदान केंद्रावर नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह केंद्राचा ताबा घेणार असल्यामुळे या शाळा व महाविद्यालयांना दोन दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.



