Amaravti GraminLatest NewsSocial News

चांदूर रेल्वे येथे होमगार्ड पथकाचा ७९ वा वर्धापन दिन सप्ताह उत्साहात साजरा

चांदूर रेल्वे

चांदूर रेल्वे येथे होमगार्ड पथकाचा ७९ वा वर्धापन दिन सप्ताह मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला. परेड, भव्य पायदळ रॅली तसेच जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून होमगार्ड दलाची समाजातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.

जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार व केंद्रनायक दीपक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने चांदूर रेल्वे होमगार्ड पथकात साप्ताहिक परेडचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर भव्य पायदळ रॅली काढण्यात आली. ही रॅली पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथून सुरू होऊन सिनेमा चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, रेल्वे स्टेशन चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तालुका समादेशक कार्यालयाजवळ समारोपास आली.

या रॅलीत पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांनी शिस्तबद्ध आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान होमगार्ड संघटनेचे कार्य, आपत्कालीन सेवा, सामाजिक सुरक्षा तसेच नागरिकांच्या मदतीसाठी होमगार्ड दलाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी तालुका समादेशक अधिकारी चंद्रकांत ऊर्फ ललित पवार यांनी उपस्थित होमगार्ड सैनिकांना ७९ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजसेवेत होमगार्ड सैनिकांनी बजावलेल्या निष्ठावंत व समर्पित सेवाभावाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाची सांगता पथकातील सुभाष घोडेश्वर यांनी आभार प्रदर्शनाने केली. या यशस्वी आयोजनासाठी पथकातील मुरायते, टेवरे, सोनवणे, तांडेकर, अग्रवाल, गोगटे व काळपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button