AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीतील भाजी बाजार हत्याकांड; मुख्य आरोपी अटकेत, उर्वरितांचा शोध सुरू

अमरावती

अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरात घडलेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तातडीची कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेनंतर परिसरात झालेल्या तोडफोडीच्या प्रकाराचाही तपास वेगाने सुरू आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त (डीसीपी) श्याम घुगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. त्यांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यात वैभव पत्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले, शुभम ढोले आणि विशाल ढोले अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यापैकी विशाल ढोले याला पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

घटनेनंतर भाजी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याची नोंद झाली असून, या उच्छादप्रकरणी सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे संकेत मिळाले असून, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास डीसीपी श्याम घुगे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू असून, पुढील कारवाई लवकरच अपेक्षित आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button