मराठवाडा इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन खुलताबाद येथे संपन्न! १०० शोधनिबंध सादर

खुलताबाद : दोन दिवसीय मराठवाडा इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन आज चिस्तिया महाविद्यालय, खुलताबाद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात देशभरातील ४०० हून अधिक इतिहास संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक उपस्थित होते.
कुलगुरूंनी केले समारोप
अधिवेशनाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उप-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरोदे सर उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप झाला.
१०० हून अधिक संशोधन पेपर
या महत्त्वाच्या अधिवेशनात इतिहास संशोधनाचे विविध पैलू मांडणारे एकूण १०० संशोधन पेपर सादर करण्यात आले. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून आलेल्या अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर करून चर्चासत्राला विशेष उंची मिळवून दिली.
तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड
अधिवेशनादरम्यान झालेल्या आमसभेत परिषदेच्या पुढील तीन वर्षांसाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष: डॉ. गोपाल बचिरे
सचिव: डॉ. शरद गावंडे
उपाध्यक्ष: गजानन पाटील
याशिवाय जिल्हा प्रतिनिधी आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
ग्रंथ प्रकाशन सोहळा
या सोहळ्यादरम्यान काही महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. यामध्ये प्रा. शेख समरिन, डॉ. शिल्पा खोत आणि डॉ. अफरोजा मॅडम यांच्या पुस्तकांचा तसेच परिषदेच्या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. हरी जमाले, प्राचार्य डॉ. आसिफ झकेरिया, डॉ. गनी पटेल, अर्शिया कादरी, डॉ. सुभाष बागल, मोहम्मद रियाज, डॉ. शिल्पा खोत आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. हरी जमाले यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. शिल्पा खोत व डॉ. घोलप यांनी केले.



