AmravatiLatest News

तक्षशिला पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांची दिवंगत रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकाला भेट


अमरावती : अमरावती शहरातील तक्षशिला पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी  मार्डी रोडवरील  श्री रा.सु. (दादासाहेब) गवई यांच्या स्मारकाला  भेट दिली. दादासाहेब गवई  यांनी आयुष्यभर समाजजीवनासाठी कार्य केले. समाजाच्या उत्थानाकरिता राज्य विधानपरिषद, संसदेमध्ये सातत्याने आवाज उठविला. त्यांची विविध ठिकाणी भाषणे झालीत. विधानपरिषद असो वा संसद, त्यांनी केलेली भाषणे स्मारकामधील स्मृति केंद्र येथे संग्रहीत करुन ठेवण्यात आली आहेत तसेच डिजिटल पोस्टर द्वारे त्यांचा जीवनपट दाखविण्यात आला आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांनी दादासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून, स्मारकामधील श्री दादासाहेब गवई यांचे जीवनचरित्र, त्यांची विधानपरिषद, संसदेमधील भाषणे, त्यांचा जीवन परिचय विडिओ स्वरूपात बघून इयर फोनव्दारे ऐकून घेत दादासाहेबांच्या विचारकार्याला पुढे नेवू असे विचार व्यक्त केले.
यावेळी स्मारकाचे संपदा व्यवस्थापक श्री धम्मदीप गवई, अजिंक्य ढोले, श्री. डी.पी. जुमाडे, पी.एम.मसले,ए.एन.शेगोकार ,एम.एस.भटकर,ए.पी.उमरकर, ए.एन.ठाकरे,एस.ए.खंडारे,ए.एन.ठाकरे , एस.पी.वाडेकर,एस.एन.पाटील,एस.पी.देशमुख,टी.एस.देशमुख,आर.आर.शर्मा  व अन्य कर्मचारी, मोठ्या संखेने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button