AmravatiLatest NewsSocial News

विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन व मानवाधिकार दिन उत्साहात

श्रमदान उपक्रमातून विद्याथ्र्यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

अमरावती (दि.11.12.2025) –  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन व मानवाधिकार दिन विशेष उपक्रमाने संपन्न झाला. सामाजिक दायित्व, पारदर्शकता आणि मानवी मूल्यांचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने विभागाच्यावतीने विद्यापीठ परिसरात विद्याथ्र्यांनी श्रमदान करुन सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक होते.
               अध्यक्षीय भाषणात डॉ. के.बी. नायक म्हणाले, भ्रष्टाचार देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीला बाधा आणतो, त्यामुळे तरुणांनी प्रामाणिकपणा, नैतिकता, उत्तरदायित्वाची भावना बाळगून समाजनिर्मितीत सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. मानवी अधिकार हे प्रत्येकाचे जन्मसिध्द हक्क आहेत, त्यांचे संरक्षण सर्वांच्याच उदायित्वाचा विषय आहे. यावेळी कायदे, संविधानातील तरतुदी आणि मानवाधिकारांच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगत, समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी विद्यार्थीच प्रमुख शक्ती असल्याचे डॉ. नायक म्हणाले.
               याप्रसंगी सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोधक, अध्यापक यांनी परिसरात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन जनजागृती, स्वच्छ परिसर अभियान, वृक्षतळ साफसफाई, श्रमदान असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने विद्याथ्र्यांना मानवाधिकारांची व्याप्ती, संरक्षण करणा-या संस्था, संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्याथ्र्यांनी सुध्दा भ्रष्टाचार विरोधी संकल्पना, मानवाधिकार संरक्षण, समाजातील नैतिक मूल्यांविषयी विशेष दखल घेतली. संचालन कु. एन.एन.काळे, तर आभार कु. साक्षी भगत हिने मानले. कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापकवृंद डॉ. प्रशांत भगत, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. रोहिणी वावरे, प्रा.साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे, श्री प्रवीण गडलिंगकर, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button