AmravatiLatest NewsMaharashtra Politics

31 हजार 5 लोकसंख्या… मुस्लिम बहुल, राजकीयदृष्ट्या प्रभावी आणि शहराच्या सत्ताकारणाला दिशा देणारा प्रभाग.

मेनन कॉलनी, नूर नगर, टीचर कॉलनी, जमील कॉलनी, ट्रक टर्मिनल, अस्मा कॉलनी, यास्मिन नगर, गुलिश्ता नगर, अराफत नगर, भिवंडी नगर, गंभीरपुरा, लालखडी आणि अल्हीलाल कॉलनी — या सर्व भागांचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक 4 हा अमरावतीच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक.

2025 ची निवडणूक मात्र अधिक खास ठरणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं. कारण यंदा ही निवडणूक लढवली जाणार आहे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली.

2017 मध्ये भारतीय जनता पक्षात असताना त्यांचा प्रभाव शहरभर होता.
आता 2025 मध्ये— नवीन राजकीय समीकरण, नवी भूमिका आणि नवा राजकीय संदेश घेऊन डॉ. देशमुख पुन्हा मैदानात.

आणि लाखमोलाचा प्रश्न कायम —
“मुस्लिम बहुल प्रभागात डॉ. सुनील देशमुख आपला दबदबा पुन्हा सिद्ध करू शकतात का?”


2017 च्या निवडणुकीचा सविस्तर आढावा

2017 च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये तुफानी संघर्ष.
एकूण उमेदवार – 34

  • अ – 9
  • ब – 6
  • क – 7
  • ड – 12

प्रत्येक वर्गात तिढा… मतांचे तुकडे… आणि धक्कादायक निकाल!

अ वर्गातील लढत – AIMIM चा दणदणीत विजय

AIMIM चे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी IUML चे मोहम्मद इमरान यांना तब्बल 1,705 मतांनी पराभूत केले.
→ हा निकाल काँग्रेस व IUML दोघांसाठी मोठा धक्का मानला गेला.

ब वर्ग – 185 मतांनी AIMIMचा आणखी एक धक्का

AIMIM चे साहेब बी. कयूमशहा
VS
काँग्रेसच्या सलिमा बी
→ विजयी फरक: 185 मते

लहान फरक… पण मोठी राजकीय उलथापालथ.

क वर्ग – AIMIMचा तिसरा सलग झेंडा

AIMIMच्या नजमुननिसा महेमूद यांनी काँग्रेसच्या करिमाबी बाबूंना
329 मतांनी पराभूत करत हॅटट्रिक पूर्ण!

ड वर्ग – काँग्रेसचा एकमेव आधार

चौकोनी लढत — AIMIM, सपा, IUML आणि काँग्रेस समोरासमोर.
शेवटी काँग्रेसचे अब्दुल वसीम मजीद यांनी AIMIM च्या जाकी मुल्ला यांना
807 मतांनी मात देत काँग्रेसचा एकमेव विजय नोंदवला.


2017 नंतरचा राजकीय भूचाल

मुस्लिम बहुल भागात वर्षानुवर्षे मजबूत असलेली काँग्रेसचा प्रभाव 2017 मध्ये मोठ्या प्रमाणात ढासळला.
AIMIM ने 4 पैकी 3 जागा जिंकत संपूर्ण राजकीय गणित उलथून टाकले.
जमील कॉलनीचा राजकीय चेहरा 2017 नंतर पूर्ण बदलला.


2025 – पुन्हा तुफानी लढत, पण यंदा समीकरणे वेगळी!

  • काँग्रेस हरवलेली गढी परत मिळवणार?
  • AIMIM आपला दबदबा वाढवणार?
  • नवीन चेहरे आता पुढे येणार?
  • की 2017 चे विजेते उमेदवार पुन्हा रिंगणात?

आणि सर्वात मोठा प्रश्न —
डॉ. सुनील देशमुख मुस्लिम बहुल क्षेत्रात नवी पायाभरणी करू शकतात का?

2025 च्या मतदान पेटीतूनच या सर्व प्रश्नांची उत्तरं बाहेर येणार आहेत.
तोपर्यंत, अमरावती महानगरपालिकेच्या इतिहास के पन्नों से… या मालिकेचा प्रवास सुरूच राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button