मुंबई–नाशिक प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता डायरेक्ट लोकल ट्रेन धावणार, दोन नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी

मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी एक्सप्रेस किंवा मेल ट्रेनची वाट पहावी लागणार नाही. मुंबई ते नाशिक डायरेक्ट लोकल (MEMU Shuttle) सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून दोन नवीन रेल्वे मार्गिकांना औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील
मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या दोन महत्त्वाच्या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वेमार्ग उभारले जाणार आहेत. सुमारे 131 किमी अंतराच्या या प्रकल्पामुळे अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई–नाशिक रेल्वे मार्गावर मोठी सुधारणा होणार आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीत यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. विशेषतःकसारा घाटाचा उतार–चढाव आणि मेमू लोकलच्या क्षमतांची चाचणी हा मोठा मुद्दा होता. मात्र आता सर्व चाचण्या पूर्णत्वास येत असून लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक–कसारा मार्गावर पुढील नवी स्थानके प्रस्तावित आहेत: पाडळी, वैतरणानगर, चिंचलेखैरे कसारा–इगतपुरीदरम्यानच्या कामासाठीही निधी मंजूर झाला आहे.
प्रवासासाठी हे आनंदाची बातमी आहे या प्रकल्पामुळे प्रवाशांना अनेक फायदे होणार प्रकल्पामुळे मुंबई–नाशिकदरम्यान थेट लोकल सेवा, एक्सप्रेस/मेल ट्रेनवरील अवलंबित्व कमी, गर्दीच्या मार्गावर गाड्यांची रेलचेल कमी, वेळेची मोठी बचत, या सारखे अनेक फायदे होणार दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा. सध्या मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य मार्गिकेवर गाड्यांची प्रचंड वर्दळ आहे. त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या मार्गातील स्टेशनांवर थांबवाव्या लागतात. नवीन मार्गिकांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
लवकरच सुरू होणार मुंबई–नाशिक MEMU शटल
रेल्वे प्रशासनाकडून मेमू शटल लोकलसाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात येत असून ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई–नाशिक प्रवाशांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून, दोन शहरांमधील दळणवळण आणखी सुकर होणार आहे.



