AmravatiLatest News

कमलज्योत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतले दादासाहेब गवई स्मृतीस्थळाचे दर्शन

अमरावती : शहरातील नवसारी येथील कमलज्योत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी-शिक्षकांसह कर्मचारी वृंद यांनी श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मृतीस्थळाला भेट देवून दादासाहेब गवई यांना अभिवादन केले.
श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर विविध ठिकाणांहून शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षकवृंद भेट देऊन दादासाहेब गवई यांच्या कार्याला उजाळा देत आहेत. आतापर्यंत अनेक शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थी, शिक्षकांसह कर्मचारीवृंदांनी दादासाहेब गवई यांच्या स्मारकाला भेटी दिल्यात. कमलज्योत प्राथ. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा दादासाहेब गवई यांच्या स्मारकाला भेट देत त्यांचे समाजजीवनासाठीच्या कार्याची माहिती जाणून घेतली. यावेळी स्मारकाचे संपदा व्यवस्थापक धम्मदीप गवई, पर्यवेक्षक अजिंक्य ढोले , शाळेचे आर. ए. खवले, अमोल वाघमारे, भाग्यश्री वानखडे, वर्षा तरायकर, शिवानी गजभिये, अमित गोंडाणे, सुमित गोंडाणे, देवानंद शेंडे,  सौ. शोभा वर्धे, अमोल उमाळे, दीपा देशमुख, शिवराज जामनिक आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button