AmravatiLatest NewsSocial News
कौशल्य विकास विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू

अमरावती | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध आहे.
🔹 अभ्यासिकेची वैशिष्ट्ये
- अभ्यासिका वातानुकूलीत असून, विद्यार्थ्यांसाठी शांत आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध आहे.
- ग्रंथालयामध्ये विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके, मासिके आणि नामांकित वर्तमानपत्रे विनामूल्य वाचनासाठी उपलब्ध आहेत.
- UPSC, MPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती, बॅंकींग आणि महाविद्यालयीन अभ्यास करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
🔹 ठिकाण व सुविधा
अभ्यासिका मध्यवर्ती बसस्थानकापासून फक्त 100 मीटर अंतरावर सुरू करण्यात आली आहे.
- पत्ता: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मशिदीजवळ, बस स्टॅन्ड रोड, अमरावती – 444 601
🔹 संपर्क व माहिती
विद्यार्थ्यांनी मोफत सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:
- 8308956236
- 7620560125
सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, या अभ्यासिकेचा लाभ घ्या आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या सुविधेचा पूर्ण उपयोग करा.



