AmravatiLatest News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्यपूर्तीचा संकल्प करावा – कुलसचिव डॉ. अविनाश असनारे

विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

अमरावती :   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट संविधान या देशाला प्रदान करुन ख­याअर्थाने सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता लोकशाहीच्या माध्यमातून नागरिकांना दिली.  त्यांचे भारतीयांवर फारमोठे उपकार असून त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले विचार पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने त्यांचा महापरिनिर्वाण दिन संकल्प दिन म्हणून साजरा करावा, असे मत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी व्यक्त केले.  डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्रामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता, त्याप्रसंगी अध्यक्षस्थावरुन ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे उपस्थित होते.

                कुलसचिव डॉ. अविनाश असनारे पुढे म्हणाले, विद्यापीठात संदेशशिल्पाची निर्मिती करुन बाबासाहेबांचे विचार पोहोचविण्याचा विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे.  याशिवाय त्यांच्या विचारावर संशोधन व अभ्यास व्हावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग सुरु करण्यात आला आहे.  डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने विविध कार्यक्रम, उपक्रम व व्याख्यानांचे आयोजन करुन बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत विद्यापीठाच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे. 

                परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी म्हणाले, बाबासाहेबांमुळेच या देशामध्ये दलित, वंचित व शोषितांना समान संधी मिळाली.  सामाजिक विकासाचे श्रेय ख­याअर्थाने बाबासाहेबांना जाते.  बाबासाहेब आमच्या मनात सदैव असून बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावा व त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.  

                मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या, बाबासाहेबांनी अन्याय, अत्याचारावर प्रखर टीका करुन अन्यायाविरद्ध लढा दिला.  स्वातंत्र्यानंतर उपेक्षित समाजाला बाबासाहेबांनी सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला.  घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना अधिकार दिले.  त्यांच्यामुळेच आज उपेक्षित समाज आणि महिलांची खरी प्रगती होतांना दिसत आहे, हे पाहून आनंद वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.

                प्रास्ताविकतेतून डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी अभिवादन कार्यक्रमामागील भूमिका मांडली.  संचालन व आभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे मानले.  अभिवादन कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button