विराज शिंदेची राष्ट्रीय स्तरावर निवड; कारंजा (लाड) शहराचा गौरव

कारंजा (लाड), वाशिम: कारंजा (लाड) शहरातील विद्यार्थी विराज संदीप शिंदे यांनी उत्तुंग कामगिरी करत Inspire Award MANAK 2024-25 या प्रतिष्ठित स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले आहे.
विराज हे उन्नत दिशा महिला विकास प्रतिष्ठानच्या सचिव चैताली शिंदे यांचे सुपुत्र असून, त्यांनी भंडारा, शहापूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत आपले अभिनव विज्ञान मॉडेल सादर केले होते. राज्यभरातून आलेल्या अनेक मॉडेल्समधून विराजच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला विशेष मान्यता मिळाली आणि त्यांच्या मॉडेलची निवड थेट राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात आली.
या उल्लेखनीय यशानंतर संपूर्ण शिंदे परिवारासह मित्रपरिवार व परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विराजवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उन्नती महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. डहाके, समन्वयक उदय इंगळे, रोशनी हिवाळे, विनोद हिवाळे, विजय हिवाळे, तारांगण धनज, तसेच संपूर्ण शिक्षकवर्ग व परिवहन समितीने विराजचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विराजची ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण कारंजा (लाड) शहरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.



