Amaravti GraminLatest News

धारणी तालुक्यात एचपी गॅसचा तुटवडा वाढला; नागरिकांची महिन्यांपासून भटकंती

धारणी: तालुक्यातील नागरिकांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून एचपी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. घरपोच सेवा ठप्प, गोडाऊनपर्यंत धावपळ, बुकिंग असूनही सिलिंडर न मिळणे—यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी वाढत आहे.

धारणीपासून अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावात एचपी गॅसचे गोडाऊन असल्याने नागरिकांना थेट तिथे जावे लागत आहे. बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर घरपोच न मिळाल्याने अनेक जण दररोज गोडाऊनवर गर्दी करत आहेत.

या गंभीर परिस्थितीवर एचपी गॅस “भाईजी एजन्सी”चे वितरक व संचालक धर्मेंद्र सोनी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “ज्या ठिकाणावरून सिलिंडरचा पुरवठा होतो, तिथेच सिलिंडरची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे नियोजित प्रमाणात गॅस उपलब्ध होत नाही.”

सोनी यांनी पुढे सांगितले, “आम्ही अधिकाधिक सिलिंडर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच धारणीमध्ये घरपोच सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी आणखी दहा-पंधरा दिवस धीर धरावा.”

दुसरीकडे, सिलिंडरसाठी होणारी धावपळ, वाढती प्रतीक्षा आणि ठप्प सेवा यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. अनेकांनी प्रशासनाला प्रश्न विचारला आहे—“अच्छे दिन कधी येणार?”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button