Amaravti GraminelectionLatest News
धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणूक: 67.2% मतदान; मतमोजणी 21 डिसेंबरला

धामणगाव रेल्वे: धामणगाव रेल्वे नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवत तब्बल 67.2 टक्के मतदान केले. शांततामय वातावरणात पूर्ण झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणीवर केंद्रित झाले आहे.
मतदानानंतर सर्व मतपेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेखाली स्ट्रॉंग रूममध्ये हलवण्यात आल्या आहेत. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी स्थगित करून 21 डिसेंबर ही नवी तारीख निश्चित करण्यात आली.
स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास कडेकोट सुरक्षा तैनात असून,
- 3 पोलीस अधिकारी
- 9 पोलीस कर्मचारी
- 10 एसआरपी जवान
सशस्त्र पहारा देत आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही देखरेखीखाली असून संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
प्रशासनाकडून पूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी काटेकोर उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मतमोजणी दिवस जसजसा जवळ येतोय, तसतशी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढत आहे.



