Crime NewsLatest NewsMaharashtraYavatmal
खोलापुरी गेट पोलिसांची मोठी कारवाई; चांदीची 20 किलोची गणपती मूर्ती जप्त, मुख्य आरोपीसह दोन साथीदारांचा शोध

यवतमाळ: खोलापुरी गेट पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्रमांक 73/2025 अंतर्गत कलम 334(1), 305, 3(5) BNS मध्ये चोरी झालेल्या चांदीच्या गणपती मूर्तीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील 20 किलो वजनाची चांदीची गणपती मूर्ती जप्त करण्यात आली असून, मुख्य आरोपी व त्याचे दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत ASI 866, NPC 944, PC 412 व PC 224 यांनी कौशल्यपूर्ण तपास करत चोरीचा मुद्देमाल शोधून काढला. सदर मूर्तीची किंमत लाखोंमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणातील आरोपी पुढीलप्रमाणे:
- अजय दिनेश पलटणकर (वय 38), रा. आठवडी बाजार जवळ, यवतमाळ
- विकास बागडे (वय 27), रा. पिंपळगाव, यवतमाळ
मुख्य आरोपीचीही पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू आहे. चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदर कारवाई गौतम धुरंदर, राजेश चौधरी, अमोल नकाशे आणि अंकुश कडू यांच्या पथकाने केली.



