AmravatiCity CrimeCrime NewsLatest News

अमरावती शहरात भूमाफियांचा हायदोस; नागरिकांना धमक्या

अमरावती, ६ डिसेंबर २०२५: अमरावती शहरातील भूमाफियांच्या हायदोसाचे चित्र सतत वाढत आहे. सातूर्णा परिसरातील रामगोपाल व्यास यांच्यासोबत घडलेली घटनेत हे स्पष्ट झाले आहे.

सातूर्णा परिसरातील बुलेट दुचाकी वाहनांच्या शोरूमजवळ रामगोपाल व्यास यांची सुमारे १५,००० चौ. फूट खुली जागा आहे. या शेजारीच एका नामांकित बिल्डरकडे प्रायव्हेट प्रोजेक्टसाठी जागा आवश्यक होती. त्यामुळे बिल्डरने व्यास यांची जागा मागितली आणि न दिल्यास जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या.

धमक्या मिळाल्यानंतर रामगोपाल व्यास यांनी गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र या सर्वांचा बिल्डरवर काहीही परिणाम झाला नाही. त्याऐवजी, बिल्डरने रात्रीच्या वेळी सिमेंटची भिंत तोडून टाकली. व्यास यांना पुन्हा पोलीसांकडे तक्रार नोंदवावी लागली, तरीही अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही.

रामगोपाल व्यास यांच्या भाव विष्णू व्यास यांच्या मते, “अमरावती शहरातील भूमाफियांची ताकद इतकी वाढली आहे की, पोलीस प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.”

या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भूमाफियांच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button