हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कायदा लागू करण्याची अमरावती येथील धर्मप्रेमींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमरावती: ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) हे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. या माध्यमातून खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, मानव तस्करी आणि दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्हे घडतात. आजवर राज्यात सहस्रो महिला आणि युवती याची शिकार झाल्या आहेत. हिंदु महिलांच्या रक्षणासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा लागू करावा, अशी मागणी अमरावती येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अमरावती निवासी जिल्हाधिकार्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे अनेक धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीकडून तीन सहस्र स्वाक्षर्यांचे निवेदन!
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात अमरावती येथील नागरिकांनी कायद्याच्या मागणीच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबवले होते. त्या माध्यमातून मिळालेल्या तीन सहस्रांहून अधिक स्वाक्षर्या यावेळी निवेदनासोबत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्या.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या:
- कठोर आणि अजामीनपात्र कायदा: उत्तर प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे गुन्हेगाराला आजन्म कारावासाची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा आणि येत्या अधिवेशनात यावर ठोस भूमिका घ्यावी.
- विशेष पोलीस शाखा: या प्रकरणांच्या अन्वेषणासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून त्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची स्वतंत्र नोंद करावी.
- सखोल अन्वेषण: लव्ह जिहाद प्रकरणांत विदेशी अर्थपुरवठा, बँक खाती, युवतींची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठीचा वापर यांचे सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- धार्मिक संघटनांवर बंदी: बळजोरीने लव्ह जिहाद, तसेच धर्मांतराला साहाय्य करणार्या किंवा प्रोत्साहन देणार्या व्यक्ती, जिहादी संघटना, धार्मिक नेते (मौलवी-मुल्ला) आणि मदरसे-मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी.
निवेदन देण्यासाठी सहभागी असलेले पदाधिकारी:
यावेळी रणरागिनी शाखेच्या अर्चना मावळे, शिवसेना महिला शहराध्यक्ष सौ वृंदा मुक्तेवार, निराली होले, पिंकी घटोरिया, पल्लवी कावरे, वेदांती दातीर, भारती यादव; तसेच श्री अभिषेक दीक्षित (राष्ट्रीय बजरंग दल व शिव प्रतिष्ठान युवा संघटन), श्री. राम देशमुख (आरएसएस), श्री पंकज बारबुद्धे (मानवाधिकार), श्री पंकज गणेश गायकवाड, श्री सिद्धार्थ चौकसे (सुराज्य अभियान), श्री महेंद्र वर्मा (गडगडेश्वर मंदिर), डॉ. दिनेश कुमार पाटील, श्री वर्माजी; तसेच हिंदू जनजागृती समितीतर्फे श्रीकांत पिसोळकर (विदर्भ समन्वयक), श्री प्रदीप गर्गे, गिरीश कोमेरवार, गिरीश जामोदे, रोशन मुळे, आणि सनातन संस्थेतर्फे श्री गिरीश कोमेरवार, श्री. गजानन सोनटक्के, डॉ. रमेश वरुडकर इत्यादी धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



