विद्यापीठाच्या हिवाळी-2025 च्या काही लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदलविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि.05.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील काही परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्याथ्र्यांना याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात येत आहे.
ज्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहेत, त्यामध्ये बी.ई. सेमि-1 व 2 (एन.ई.पी.), बी.सी.ए. (ए.आय.एम.एल.)/बी.सी.ए. (डी.एस.) सेमि-3 (एन.ई.पी.), बी.एस्सी. (सायबर सेक्युरिटी)/बी.एस्सी. (डाटा सायन्स अॅन्ड अॅनॉलिटिक्स) सेमि-3 (एन.ई.पी.), बी.आर्च. सेमि-1 (सी.बी.सी.एस.) आणि बी.ए. (लिबरल आर्टस्) सेमि-1 (एन.ई.पी.) या परीक्षांचा समावेश आहे.
यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



