AmravatiLatest NewsSports

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 05.12.2025)- सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे 26 ते 30 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरबची कु. हर्षदा चव्हाण, कु. खुशी ठवकर, कु. सोनल केरम व कु. साक्षी राऊत, श्रीमती नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय, यवतमाळची कु. रियानी गाडेकर, कु. आचल अवधुत, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळची कु. गायत्री पुरी, कु. सुहानी चाणेकर, कु. सानिका भारणे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. भैरवी मोहुर्ले, कु. मोनिका गेडाम, कु. अनुपम सुरीन, कु. प्रग्या सुनवार, कु. तृषा  मुल्लेवार व कु. वृषाली हिंगे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. गायत्री अंभोरे, राजश्री शाहु विज्ञान महाविद्यालय, चांदुररेल्वेची कु. प्रतिक्षा पाटणे, कु. सानिया सदफ, कु. भक्ती सूर्यवंशी व कु. कल्याणी कलावते, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. भक्ती चिकटे, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची कु. सलोनी अग्रवाल व श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. तन्वी भगत हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 14 ते 23 डिसेंबर दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button