अमरावती: वडिलांनी आपली किडनी देऊन मुलाचे जीवन वाचवले; ६२ वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण पूर्ण


अमरावती, दि. 05 डिसेंबर 2025: सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती येथे शुक्रवारी वडिलांनी आपली किडनी देऊन मुलाचे प्राण वाचवले. २७ वर्षीय शुभम विष्णु खोबरखेडे, भातकुली, जि. अमरावती हा काही महिन्यांपासून किडनी आजारामुळे डायलिसिसवर होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यासाठी किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपाय असल्याचे ठरले.
शुभमच्या वडिलांनी, श्री विष्णू रतिरामजी खोबरखेडे (६०), मुलाच्या भविष्याचा विचार करून आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे शुभमला नवीन जीवन लाभले.
शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्याधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी मार्गदर्शन केले.
शस्त्रक्रियेमध्ये नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रतिक चिरडे, डॉ. राहुल घुले, बधिरिकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर आणि डॉ. बाळकृष्ण बागवाले यासह अनेक विशेषज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता.
त्याचबरोबर, वैद्यकीय व परिचारक टीममध्ये डॉ. दिपाली देशमुख, डॉ. शितल सोळंके, डॉ. अश्विनी मढावी, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. नाहीद, डॉ. रमणीय, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ. सोनाली चौधरी आणि इतरांची भूमिका महत्त्वाची होती.
शस्त्रक्रियेस सहाय्यक कर्मचारी इन्चार्ज सिस्टर ज्योती तायडे, सरला राऊत, नीता कांडलकर, दिपाली तायवाडे, माधुरी सोनटक्के, वैष्णवी निकम, कीर्ती तायडे, अक्षय पवार, मयुरी खेरडे, अनु वडे, योगिश्री पडोळे, वैशाली ढोबळे, कोमल भालेकर, कल्याणी राठोड, विशाखा बरवान, अर्चना मढावी, अनिता गोमकाळे, स्मिता वानखेडे यांच्यासह आहारतज्ञ, औषध विभागाचे कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
ह्या यशस्वी किडनी प्रत्यारोपणामुळे अमरावती येथे होणाऱ्या वैद्यकीय सेवांच्या गुणवत्तेचा दाखला मिळतो. या शस्त्रक्रियेमुळे मुलाचे जीवन वाचवले गेले असून, हॉस्पिटल प्रशासन आणि वैद्यकीय संघाचे कौतुक होत आहे.



