AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत गुन्हे शाखेची कारवाई : अडीच किलोहून अधिक गांजासह एक जेरबंद

अमरावती : शहरातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने नागपुरी गेट परिसरात मोठी कारवाई करत अडीच किलोहून अधिक गांजासह एकाला अटक केली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकत शेख अफजल शेख असगर (वय ४०, रा. छाया नगर, अमरावती) याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून २ किलो ८५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून गांजासह शाईन कंपनीची दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी गांजाच्या पुरवठा साखळीत सक्रिय असल्याचा संशय आहे. त्यामुळे हा गांजा कुठून आणला आणि कुठे वितरित करायचा होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button