नंदनवन, नागपूर: २२ वर्षीय युवक बालाजी कल्याणे मृतावस्थेत आढळला; पोलिस तपास सुरु

नागपूर: नंदनवन परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरात राहणाऱ्या २२ वर्षीय बालाजी कल्याणे याचा मृतदेह नंदनवन पोलीस स्टेशनच्या मागील भागात संशयास्पद परिस्थितीत आढळला.
प्राथमिक माहिती अशी की, मृतक बालाजी कल्याणे मूळचा नांदेडचा रहिवासी होता. पोलिस भरतीसाठी तो नागपुरात आला होता आणि सध्या नंदनवन परिसरातील भाड्याच्या घरात राहत होता. बालाजीसोबत रूम पार्टनर पवन एकनाथ कोहडे राहत होता. घर डॉ. आनंद सार्वे यांचे मालकीचे असल्याचे समजते.
तपासात असेही समोर आले की, घटनेशी संबंधितपणे राणी देशमुख, जी नंदनवन येथील पांडव कॉलेजमध्ये डॉक्टर बीएमएसच्या इंटर्नशिप करत आहे, या प्रकरणात नाव जोडले गेले आहे. मात्र पोलीस अद्याप याबाबत अधिकृत माहिती देत नाहीत.
घटना नंदनवन पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात घडली, जिथे नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहताच पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक आणि नंदनवन पोलीस दाखल झाले असून, मृत्यूचे नेमके कारण आणि बालाजीच्या शेवटच्या काही तासातील हालचाली याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नंदनवन परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



