अमरावती जिल्ह्यातील 23 गावांचा ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात समावेश

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आणि आधुनिक विकासासाठी अमरावती जिल्ह्यातील 23 गावांची निवड ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, तंत्रज्ञानाधारित सेवा आणि स्मार्ट प्रशासनाची अंमलबजावणी हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पात समाविष्ट गावांची यादी :
चांदुर बाजार तालुका — बोराळा, आसेगाव, बेलोरा, टाकरखेडा पूर्णा, चिंचोली काळे, तळणी पूर्णा, वडूरा, धानोरा, खरवाडी, सर्फाबाद, खराळा, फुबगाव, जवळा शहापूर, राजुरा, जैनपूर, बेसखेडा, तळवेल, शिरजगाव बंड, रसुल्लापुर, हैदतपूर, कृष्णापूर, विरूळ पूर्णा.
अमरावती तालुका — शिराळा.
या गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सेवांमध्ये प्रमुखप्रमाणे —
- सीसीटीव्ही सर्व्हेलन्स
- वाय-फाय आणि सार्वजनिक हॉटस्पॉट सेवा
- डिजिटल शिक्षणासाठी स्मार्ट क्लासरूम
- आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागांच्या ऑनलाइन सेवा
- महिला व बालकल्याण विभागाच्या ई-सेवा
- स्मार्ट कृषी सेन्सर्स
- आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ हे भारतनेट फेज-2 नेटवर्कच्या देखभालीसह तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.
प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ समिती स्थापन करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून गावातील सर्व सेवा प्रत्यक्ष वापरात येण्यावर भर देण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचे पर्यवेक्षण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती करणार आहे.
या उपक्रमामुळे अमरावती जिल्ह्यातील निवडलेल्या गावांच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



