AmravatiHelth CareLatest News

अमरावतीत HIV जागरूकतेसाठी भव्य रॅली; हजारो विद्यार्थी व संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती: जागतिक एड्स दिन आणि एच आय व्ही माहाच्या निमित्ताने अमरावतीत आज (४ डिसेंबर) भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, शासकीय व खाजगी संस्था तसेच सामाजिक संघटनांच्या मोठ्या सहभागामुळे ही रॅली विशेष ठरली.

रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयातून झाली. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालक आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था डॉ. विजय कंदेवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यात एच आय व्ही संक्रमणाचा दर घटत असून युवावर्गाच्या सक्रिय सहभागामुळे जनजागृती अधिक प्रभावी होत आहे. त्यांनी सर्वसमावेशक जनजागृती हीच एच आय व्ही निर्मूलनाची गुरुकिल्ली असल्याचेही स्पष्ट केले.

या रॅलीत अकोला परिमंडळाचे उपसंचालक डॉ. सुशील वाकचौरे, GMC अमरावतीचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. डी.एस. वनवे तसेच IMA आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक शासकीय व खाजगी रुग्णालये, ७० खाजगी हॉस्पिटल्स, ५ उपजिल्हा रुग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालये व अनेक संस्थांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे शहरातील २,५०० हून अधिक विद्यार्थी देशभक्तीपर व जनजागृतीच्या घोषणा देत रॅलीमध्ये सहभागी झाले.

रॅलीचा मार्ग — कॉटन मार्केट, जयस्तंभ चौक, राजकमल, श्याम चौक, इर्विन चौक मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालय असा होता.

जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक रेड रिबन क्लब असलेली महाविद्यालये — इंजिनिअरिंग, नर्सिंग, फार्मसी, आयटीआय, समाजकार्य, कृषी, कला-वाणिज्य-सायन्स शाखांच्या विद्यार्थ्यांनी भव्य सहभाग नोंदवला.

उच्च जोखीम गटांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे ‘माहिती रथ’ देखील रॅलीत सहभागी झाले. स्तलांतरित कामगार, देहविक्री करणाऱ्या महिला, ट्रक चालक, MSM समुदाय तसेच एच आय व्ही संक्रमित व्यक्तींना सेवा देणाऱ्या संस्थांनी जागरुकतेचा संदेश दिला.

दिवसभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी उत्साहाने सहभाग घेत अमरावतीकरांपर्यंत एकजुटीचा आणि एच आय व्ही जागरुकतेचा प्रभावी संदेश पोहोचवला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button