AmravatiLatest News
माजी सरन्यायाधीश भुषण गवई अमरावती दौऱ्यावर; शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

देशाचे माजी सर न्यायाधीश भुषण गवई हे आज, बुधवार ३ डिसेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर आले. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर पोलीस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भुषण गवई यांच्या अमरावतीतील शासकीय विश्रामगृह येथे आगमनाच्या आधी संपूर्ण परिसराची श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच पोलिसांनी परिसरातील सुरक्षेची सखोल पाहणी करून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली.
दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेची काटेकोर व्यवस्था राखली होती.



