AmravatiCrime NewsLatest News

बडनेरा हत्या प्रकरणावर हिंदू संघटना आक्रमक; ‘नियोजित खून’ असल्याचा आरोप, सखोल चौकशीची मागणी

अमरावती : २६ नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरणात आता नव्या घडामोडी घडू लागल्या आहेत. या घटनेवर हिंदू संघटना आक्रमक होत पुढे सरसावल्या असून हा खून ‘नियोजित’ असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संघटनांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन देत प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

२६ नोव्हेंबरला ऋषिकेश खापेकर यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली होती. आता या प्रकरणात हिंदू संघटनांनी हस्तक्षेप करत आरोपी आणि या हत्येचा मास्टरमाईंड तातडीने अटक करावा, अशी मागणी केली आहे.

हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींच्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या —

  • प्रकरणाची कसून व सखोल चौकशी
  • हत्येचा मास्टरमाईंड शोधणे
  • सर्व आरोपींना तातडीने अटक
  • प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी
  • दोषींना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची मागणी

संघटनांच्या म्हणण्यानुसार, हा खून अत्यंत गंभीर आणि संशयास्पद असल्याने तपास अधिक वेगाने करून दोषींना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button