Amaravti GraminAmravatiLatest News
अमरावती ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू; १४ डिसेंबरपर्यंत अंमलबजावणी

जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हा आदेश अमरावती पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात लागू करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी १४ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.



