संसद परिसरात SIR विरोधात खर्गे, सोनिया, राहुल यांसह विरोधी पक्षांची निदर्शने; निवडणूक सुधारांवर चर्चेची मागणी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (2 डिसेंबर 2025) संसद भवन परिसरात विरोधी पक्षांनी SIR विरोधात जोरदार आंदोलन छेडले. संसदच्या मकर द्वाराजवळ अनेक विरोधी पक्षांचे खासदार व नेते एकत्र येऊन निवडणूक सुधारांवर तात्काळ चर्चा घेण्याची मागणी केली.
विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित
या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा, तसेच DMKचे कनिमोळी करुणानिधी आणि टी. आर. बाळू यांसह अनेक विरोधी पक्ष नेते सहभागी झाले होते.
नेत्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला आणि SIR संदर्भात संसदेत तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली.
निवडणूक सुधारांवर चर्चा आवश्यक – विरोधक
विरोधकांचे म्हणणे आहे की SIR संदर्भातील निर्णय व जमीनविषयक तरतुदी लोकशाही प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे संसदेत सविस्तर चर्चा करून मुद्दे स्पष्ट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनाला उधाण
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विरोधी पक्षांकडून आंदोलने तीव्र झाली असून, दोन्ही सभागृहांमध्येही याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला.
आजच्या अधिवेशनातील घडामोडींवर लक्ष केंद्रीत असताना, विरोधी पक्षांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.



