विद्यापीठाची हिवाळी-2025 एम.ए. (काऊन्सिलिंग अॅन्ड सायकोथेरेपी) ‘पर्सनॅलिटी थेअरिज’ विषयाची पुनर्परीक्षा 8 डिसेंबर रोजी होणार

विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.02.12.2025) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची एम.ए. (काऊन्सिलिंग अॅन्ड सायकोथेरेपी) सेमि.-2 (एन.ई.पी.) च्या ‘पर्सनॅलिटी थेअरिज’ या विषयाची पुनर्परीक्षा यापूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या वेळ व परीक्षा केंद्र क्र. 126 वर सोमवार दि. 08 डिसेंबर, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



