Crime NewsLatest News

महसूल विभागाची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; पाच हायवा जप्त

अमरावती, दि. २ : अमरावती तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने सोमवारी रात्री मोठी मोहीम राबवत धडक कारवाई केली. या मोहिमेत पाच हायवांवर कारवाई करून ते मुद्देमालासह जप्त करण्यात आले असून सर्व वाहने नवीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके सातत्याने वाहनांची तपासणी करत आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणीता चापले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.

अमरावती–डवरगाव मार्गावर तपासणीदरम्यान एमएच 27 डीटी 9366, एमएच 27 डीटी 6494, एमएच 27 डीटी 4555, एमएच 27 डीएल 6494 आणि एमएच 27 डीटी 1480 या क्रमांकाच्या हायवांमध्ये अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत सर्व हायवा जप्त केले.

जप्त केलेली वाहने पुढील कार्यवाहीसाठी अमरावती तहसील कार्यालय येथे लावण्यात आली आहेत.

या कारवाईत मंडळ अधिकारी सुनील उगले, गजानन हिवसे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल भगत, हेमंत गावंडे, रामकृष्ण इंगळे, पवन बोंडे, रामदास गोडे तसेच पोलीस पथकाचा सहभाग होता.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीवर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button