Crime NewsLatest NewsNanded

आंतरजातीय प्रेमसंबंधाचा भीषण अंत : सक्षम ताटेच्या हत्येने नांदेडसह राज्य हादरले

नांदेड जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधातून 19 वर्षीय सक्षम ताटे याची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणात प्रेयसी आंचल मामीडवार हिचे वडील आणि भावांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर समाजमन सुन्न झालं असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाढदिवसाच्या चार दिवस आधी काळाचा घात

1 डिसेंबर रोजी सक्षमचा वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाच्या अवघ्या चार दिवस आधीच त्याचा निर्घृण खून करण्यात आला. वाढदिवसानंतर दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करत होते, अशी भावूक माहिती आंचलने दिली आहे.

मृतदेहासमोर विवाह, आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय

या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह करत, आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

माझ्यासाठी तो धर्म बदलायला तयार होता’ – आंचलचा धक्कादायक खुलासा

आंचल आणि सक्षम यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र जातीचा आडसर ठरला. घरच्यांचा तीव्र विरोध असतानाही सक्षम माझ्यासाठी धर्म स्वीकारण्यासही तयार होता, असा धक्कादायक खुलासा आंचलने केला आहे.

‘ते हरले, माझा प्रियकर मरूनही जिंकला’ – आंचलचा आक्रोश

आंचलने सांगितले की, सक्षम जेलमधून सुटल्यानंतरच माझ्या कुटुंबातील काही लोक त्याच्या हत्येचा कट रचत होते. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने त्याची हत्या केली. त्यांनी माझा प्रियकर मारला, पण ते हरले आणि तो मरूनही जिंकला, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही तिने केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड, दोन्ही भाऊ आणि इतर सहकाऱ्यांसह पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामीलवाड, साहील ठाकूर, सोमनाथ लखे आणि वेदांत यांचा समावेश आहे.

हत्येपूर्वी आईने दिली धमकी

या प्रकरणात आणखी एक मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सक्षमच्या हत्येच्या अवघ्या दोन तास आधी आंचलची आई जयश्री मामीडवार ही सक्षमच्या घरी गेली होती. तिने सक्षमला “आमच्या पोरीपासून दूर राहा” अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अवघ्या दोन तासांत सक्षमची हत्या करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button