AmravatiLatest News

३९ व्या आंतर विद्यापीठ मध्य विभाग युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ठरले ‘चॅम्पियन’ 

विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच पटकावले विजेतेपद

अमरावती : (दि. 01.12.2025) एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३९ व्या आंतर विद्यापीठ मध्य विभाग युवा महोत्सव (२०२५-२६) मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या दमदार कामगिरीने इतिहास रचला आहे. तीन राज्यांतील २३ विद्यापीठांना मागे टाकत अमरावती विद्यापीठाने ‘चॅम्पियन’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हे विजेतेपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.  या स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या चमूमध्ये एकूण ४७ स्पर्धक कलावंत आणि १० साथिदार यांचा समावेश होता. या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत एकूण १४ पारितोषिके प्राप्त केली.

                 विद्यापीठाच्या चमूने विविध कला प्रकारांमध्ये आपल्या कौशल्याची छाप पाडली असून समूह नृत्य, समूह वाद्यवृंद, शोभायात्रा, पाश्चिमात्य इंस्ट्रुमेंटल सोलो, पाश्चिमात्य व्होकल सोलो, एकांकिका, मिमिक्री, मातीकाम (क्थ्ठ्ठन्र् ग्दृड्डड्ढथ्त्दढ़), रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक, भारतीय समूहगान, माईम, कार्टूनिंग आणि जनरल क्वीझ स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक, तर क्रिएटिव्ह कोरिओग्राफी, शास्त्रीय नृत्य, वेस्टर्न ग्रुप सॉंग, स्पॉट पेंटिंग आणि हिंदी वक्तृत्व या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकाविले आहे.  याशिवाय क्लासिकल व्होकल सोलो, इंग्रजी वादविवाद, स्कीट व कोलाजमध्ये चतुर्थ स्थान, तर स्वरवाद्य व तालवाद्य प्रकारात पाचवे स्थान मिळवले आहे.  या यशासोबतच नृत्य, ड्रामा, संगीत आणि फाईन आर्ट या कलाप्रकारांमध्येही विद्यापीठाने ‘ओव्हर ऑल चॅम्पियनशिप’ प्राप्त केली आहे. याप्रसंगी विजेत्यांना एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलपती श्री. अंकुश कदम आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.


विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब

                       विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे हे यश असून आजवरच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाला हे चॅम्पियनपद मिळाले आहे.  या यशात चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. शितलबाबू तायडे व डॉ. वैशाली मेश्राम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या घवघवीत यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button