आज सोना आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज 600 रुपयांनी सोनं वधारलं आहे. तर चांदीच्या दरातही साधारण 3000 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. देशात सोनं-चांदीच्या दरात किती वाढ झाली आणि आजचे दर काय जाणून घेऊयात.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दरात कपात होण्याची शक्यता असतानाच सोनं पुन्हा एकदा वधारलं आहे. गुंतवणुकदारांनी सोन्यात दाखवलेली रुची आणि जगभरातून मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळंही सोन्याच्या दरात वाढ नोंदवली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून 1,30,480 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोनं 1,19,600 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली असून 97,860 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,860 रुपये
- 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,960 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,048 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,786 रुपये - 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 95,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,384 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 78,288 रुपये - मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,860 रुपये



