दर्यापूरमधील काँग्रेस उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांच्या प्रचाराला जनसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद

दर्यापूर शहरातील बाभळी गावातून काँग्रेस उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांच्या प्रचाराला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. घराघरात, गल्ली‑गल्लीत होणाऱ्या प्रचार मोहिमेत स्थानिकांनी स्पष्टपणे त्यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिल्याचे म्हणत आहेत.
या प्रचारात विशेष लक्षात येणारी बाब म्हणजे — मोठ्या संख्येने नारीशक्ती रस्त्यावर उतरलेली दिसत आहे. स्थानिकांच्या मते, आता पर्यंत अशा प्रमाणात महिलांचा सहभाग क्वचितच पहावयास मिळाला होता.
सरकार नेते व स्थानिक नेते सुधाकर भारसाखरे यांचे व्यक्तिमत्त्व व जनविश्वास लक्षात घेता, दर्यापूरमधील लोकसंख्या काँग्रेसकडे कल दर्शवत असल्याचे चर्चा आहे. अनेक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “या वेळी मंदाकिनी ताईच नगराध्यक्ष” हाच लोकांचा ठाम इच्छाशक्तीचा आवाज आहे.
स्थानिक वातावरण आणि प्रचार मोहिमेच्या गतीवरून असे दिसतेय की — या वेळी काँग्रेस उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळण्याची शक्यता आहे.



