AmravatiamravatinewscitynewsLatest News

अमरावतीत सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिटेल मेगा क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम यशस्वी

अमरावती — सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफीस अमरावतीच्या वतीने रिटेल मेगा क्रेडिट आऊटरीच एक्सिबिशनचे भव्य आयोजन अमरावतीतील अभियंता भवनात करण्यात आले. झोनल हेड अजयकुमार सिंह आणि डीझेडएच आशा कोतस्थाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, ज्यात शेकडो ग्राहक आणि संभाव्य ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रादेशिक प्रमुख अमरावती यांनी केली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रसन्नजित चव्हाण, पी.आर. पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप जावंदिया, गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अनिल कुरळकर, शिक्षक संघटनाचे अध्यक्ष अजय आनंद पवार, तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांचा समावेश होता.

उपस्थित मान्यवरांनी सेंट्रल बँकच्या ग्राहकाभिमुख सेवांचे महत्त्व आणि आर्थिक साक्षरतेचे फायदे अधोरेखित केले. कार्यक्रमात रिटेल कर्जदारांना धनादेश व मंजुरीपत्रांचे वितरण केले गेले.

अमरावतीनंतर पुढील शिबिर यवतमाळ येथे आयोजित केले जाणार आहे. शिबिरातील ठळक आकडेवारीनुसार एकूण ₹4.70 कोटी मंजुरी आणि ₹4.94 कोटी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशाबाबत सर्वांनी एफजीएम अजयकुमार सिंह यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button