अचलपुर–परतवाडा नगर परिषद निवडणूक: युवा स्वाभिमान पक्षाचा जोरदार प्रचार; आ. रवि राणांची भव्य पदयात्रा

अमरावती — अचलपुर–परतवाडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना, युवा स्वाभिमान पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार रवि राणा यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून भव्य पदयात्रा काढली आणि मतदारांशी संवाद साधला.
पदयात्रेमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार वंदना राजेंद्र लोहीया, शुभम पुरोहित, माया तेजाभाऊ धवने, निशा राजेंद्र गावंडे, नितीन प्यारेलाल यादव, तमिज शहा, रहीमान शहा, राजवंदी गुणवंतराव वानखडे, रक्षा राहुल वानखडे, रवि गुणवंत वानखडे, बबलु दादाराव वानखडे उपस्थित होते.
आ. रवि राणा यांनी प्रभागा-प्रभागात जाऊन प्रत्येक उमेदवाराची माहिती नागरिकांना दिली आणि पान्हा चिन्हावर मतदान करून उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून, त्यांच्या विजयासाठी आणि हितासाठी आम्ही घराघरात जाऊन मतदान मागणार आहोत. युवा स्वाभिमान पक्ष विकासाच्या धारावर नेणारे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहे.”
पदयात्रेत स्थानिक नागरिक, महिला आणि युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. JCBद्वारे फुलांचा वर्षाव करून उमेदवारांचे स्वागत केले गेले, तसेच ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष वातावरण निर्माण झाले.
यावेळी पदयात्रेत सहभागी म्हणून राजेंद्र लोहीया, मनिष अग्रवाल, उपेन बछले, रविंद्र गवई, बंटी केजडीवाल, राहुल वानखडे, शिला अवसरमोल, निलेश जयसिंघानी, पुष्पा बेलोरकर, कैलास गणेशे, प्रभारी अविनाश काळे, प्रा. संतोष बनसोड, संजय पंडीत, अनुप अग्रवाल, दिपक जलतारे, शुभम उंबरकर, वैभव गोस्वामी, पवन कापशिकर, राजेश गावंडे, सुमन बेलसरे, संगीता बेलसरे, संगीता रावत, अर्चना मेटकर, तेजाभाऊ धवने, हरीष शिंपीकर, विपुल वासनकर, राम हेकडे, प्रमोद शनवारे यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पदयात्रेने परिसरात निवडणूक चैतन्य अधिकच वाढवले आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराला नवा वेग दिला आहे.



