AmravatiamravatinewscitynewsLatest News

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नैसर्गिक शेतीच हाच उत्तम पर्याय – जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेचे शेतकऱ्यांना आवाहन

आज जगभरात सुरक्षित आणि शुद्ध अन्नपदार्थांची मागणी वाढत आहे. मात्र, शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा तब्बल 95% पेक्षा अधिक वापर होत असल्याने जमिनीचा कस कमी होत आहे, तसेच मानवी आरोग्यावरही त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक व सेंद्रीय निविष्ठांचा वापर वाढवून ‘रेसिड्यू-फ्री’ शेतीकडे वळावे, असे आवाहन अमरावलीतील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेने केले आहे.

जिवाणू संघाची उपलब्धता आणि जनजागृती

अमरावती येथील कृषि संकुल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड (444602) येथे या प्रयोगशाळेद्वारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे जिवाणू संघ उपलब्ध करून दिले जात आहेत.
संपर्क : 0721-2550372

उपलब्ध जैविक निविष्ठा

  • नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू — रायझोबियम, अझॉटोबॅक्टर
  • स्फुरद (फॉस्फरस) विरघळविणारे जिवाणू
  • पालाश (पोटॅश) विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू
  • संयुक्त द्रवरूप जिवाणू संघ

हे सर्व उत्पादन शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.

सरकारी विक्री दर

  • 100 मिली – ₹50
  • 250 मिली – ₹110
  • 500 मिली – ₹210

प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांसाठी जिवाणू उत्पादन, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणाचीही सुविधा आहे.


जैविक निविष्ठांचे बहुआयामी फायदे

भौतिक फायदे

  • जमीन भुसभुशीत होते
  • पाणी धारण क्षमता वाढते
  • तापमान नियंत्रणात राहते

रासायनिक फायदे

  • अन्नद्रव्ये जमिनीत टिकून राहतात
  • जमिनीचा pH (सामु) संतुलित राहतो
  • दुबार पेरणीसाठी नत्र साठा उपलब्ध होतो

जैविक फायदे

  • सूक्ष्मजीवांमुळे सेंद्रीय घटकांचे उत्तम विघटन
  • प्रदूषकांचे विघटन
  • रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी

शेतकऱ्यांसाठी आर्थिक व उत्पादनात्मक फायदे

  • उत्पादन खर्चात लक्षणीय बचत
  • धान्याचा दर्जा सुधारतो
  • पिकांचे उत्पन्न वाढते
  • रसायनमुक्त अन्नपदार्थ मिळतात

पर्यावरणीय परिणामही तितकेच महत्त्वाचे आहेत. रसायनांचा वापर टाळल्याने जैवविविधतेचे संरक्षण, जमिनीचे आरोग्य आणि मानवी आरोग्यातही सुधारणा होते.


नैसर्गिक शेती – शाश्वत शेतीकडे वाटचाल

जैविक प्रयोगशाळेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले की, जैविक खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी केले, तर शेतकरी शाश्वत शेती, उत्तम उत्पादन आणि सुरक्षित अन्नपदार्थांच्या दिशेने मोठी पाऊल उचलतील.

जमिनीचे आरोग्य, पर्यावरण व शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी नैसर्गिक शेतीच हा सर्वोत्तम मार्ग असल्याचा पुनरुच्चार प्रयोगशाळेने केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button