Amaravti GraminAmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra Politicspolitics

चांदूरबाजारमध्ये भाजपची ताकद प्रदर्शन सभा; सिद्धांत वानखडे यांच्या भाषणाने प्रचाराला चेतना

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदूरबाजार शहरात भारतीय जनता पक्षाने गुरुवारी दमदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाचे प्रवक्ते सिद्धांत वानखडे यांनी प्रभावी भाषण करत प्रचारमोहीमेची गती वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या प्रमुख भाषणात वानखडे यांनी नगरपरिषद निवडणुकीचा आढावा घेत केंद्र व राज्य सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली.

चांदूरबाजारच्या स्थानिक गरजा, प्रलंबित प्रश्न, तसेच झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत भाजपच्या आगामी कार्ययोजनेचेही त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सभेला उमेदवार कांताबाई अहिर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदूरबाजारमध्ये ही सभा होत असताना मतदारांमध्ये निवडणुकीचे वातावरण आणखी तापले असून, भाजपची निवडणूक मोहीम आता वेग घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button