AmravatiLatest NewsSports

27 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मीट क्रीडा महोत्सवाकरिता विद्यापीठाचे खो-खो (पुरुष व महिला) संघ घोषित

अमरावती (दि. 27.11.2025)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे 04 ते 08 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मीट क्रीडा महोत्सवाकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे खो – खो (पुरुष व महिला) संघ घोषित करण्यात आले आहे.
पुरुष संघ
चमूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा भूषण गेडाम, कुणाल शिखरे, यश सदांशिव, कौशिक गहलोत, प्रथमेश माहोरे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराचा रोहण बरकारे, आदित्य राऊत, सुबोध धंदर, राधे अकर्ते, स्व. एन.ए. देशमुख महाविद्यालय, चांदुरबाजारचा मयूर खंडारे, अंकुश सिरसाट, इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगांवचा ओम देशमुख, तेजस भालेराव, रामकृष्ण महाविद्यालय, दारापूरचा सुफियान खान पठाण, रोहण मेश्राम, महात्मा फुले महाविद्यालय, अमरावतीचा आदित्य नागदिवे, कला, वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकळचा आयुष बोरखडे, कला महाविद्यालय, बुलडाणाचा ज्ञाने·ार चिमकुरे, आर.ए. महाविद्यालय, वाशिमचा साहिल राऊत, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा  अशोक नागले याचा समावेश आहे.
महिला संघ
श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. वैष्णवी ढोके, कु. सलोनी खंडारे, धरती मोहोड, तनिषा सवई, एल.बी. अणे महिला महाविद्यालय, यवतमाळची कु. प्रिती धाकरगे, वेदिका काळे, कु. भूमिका कोडपकवार, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. श्रध्दा नागदिवे, कु. साक्षी वानखडे, कु. पल्लवी पारडे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. दिव्या सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीची कु. सनिका सोलिव, कु. नेहा अटाळकर, कु. प्रियंका दहिहांडे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराची कु. वैष्णवी मस्के, कु. ज्ञाने·ारी वानखडे, शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगांवची कु. अवंतिका वासनिक, स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठची कु. रेशमा गजभिये, कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकळची कु. वैष्णवी मुकुंद आणि बी.एस. पाटील महाविद्यालय, परतवाडाची कु. स्वाती पळसकर हिचा समावेश आहे.
               निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती येथे दि. 27 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button