Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवरील आक्षेपाची मुदत वाढवली

महानगर पालिका निवडणुकीसाठी जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी २७ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना आक्षेप नोंदवण्याची संधी दिली होती, मात्र वाढत्या तक्रारी आणि मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने ही मुदत आता ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

गुरुवार, २७ नोव्हेंबरपर्यंत एकूण २६२ नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. यात नाव गहाळ असणे, पत्ता चुकीचा असणे, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी आढळणे यासारख्या त्रुटींवर नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदार यादीतील तुमचे नाव, पत्ता आणि तपशील अचूक आहेत का, हे त्वरित तपासा. आवश्यक बदल किंवा दुरुस्तीसाठी ३ डिसेंबर ही शेवटची संधी आहे.

महापालिका निवडणूक जवळ येत असल्याने मतदार यादी अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागरिकांनी आपले आक्षेप लवकरात लवकर नोंदवावेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button