पारडीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; परिसरात खळबळ, पोलिस तपास सुरू

पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सूचना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्यासह पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख त्वरित पटवणे शक्य झाले नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचे वय, लिंग आणि अंदाजित मृत्यूचा कालावधी निश्चित करण्यासाठी पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस तपासाला वेग मिळाला असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मागील काही दिवसांत दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी, तसेच स्थानिकांकडून माहिती घेऊन तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी सांगितले की,
“मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सर्व शक्य दिशांनी तपास सुरू आहे. मृत्यूचे कारणही लवकरच स्पष्ट होईल.”
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
पुढील माहिती उपलब्ध होताच आपणास अपडेट देण्यात येईल.



