BollywoodIndia NewsLatest News
धर्मेंद्र यांच्या श्रद्धांजली सभेचे देओल कुटुंबाकडून आयोजन; ‘Celebration of Life’ कार्यक्रम आज मुंबईत

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबाकडून आज (गुरुवार) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांनी खाजगी अंत्यसंस्कार केले होते. त्यानंतर आता चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांना अंतिम आदरांजली अर्पण करता यावी यासाठी हा कार्यक्रम खुला ठेवण्यात आला आहे.
‘Celebration of Life’ या नावाने आयोजित करण्यात आलेली ही श्रद्धांजली सभा मुंबईतील बांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलच्या लॉन्समध्ये संध्याकाळी 5 वाजता सुरू होऊन 7.30 वाजेपर्यंत चालणार आहे.
चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता असून, धर्मेंद्र यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला आदरांजली देण्यासाठी मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.



